पुरणाच्या करंज्या

साहित्य: २ वाट्या चणाडाळ
२ वाट्या गूळ
काजू,बदाम,पिस्ते ह्यांचे बारीक केलेले तुकडे,वेलचीचूर्ण,तेल,मीठ
करंज्या तळण्यासाठी रिफाईंड तेल अथवा वनस्पती तूप(आपापल्या आवडीप्रमाणे)
कृती: चणाडाळ पुरणासाठी तशी मऊ शिजवावी;पाणी पूर्ण काढून गूळ घालून शिजवावी.गूळ घालतेवेळी जरा उशीरा सुक्यामेव्याचे तुकडे घालून आटवावी.पूरण थंड होऊ द्यावे.

मैद्यामध्ये तुपाचे जास्त मोहन घालून,चवीपुरते मीठ घालून मैदा घट्ट मळावा. २ तासानंतर करंज्यांसाठी छोट्या पुर्‍या लाटून त्यात पुरण भरून करंज्यांना मुरड घालावी किंवा काताण्याने कातून मग त्या तळाव्या.

लेखिका: जयबाला परूळेकर




1 टिप्पणी:

Suhas Diwakar Zele म्हणाले...

अशीच ओल्या नारळाची पण करंजी होते ना... तोंडाला पाणी सुटलं :)