ती!

ती गझल पाडताना होतो घरात कल्ला
तो सोहळा चवीने बघतो गली-मुहल्ला! 

ती रदिफ़-काफ़ियाच्या भाषेत बोलते हो,
फेकेल शेर ताजा, मागाल जरी सल्ला! 

गाते तिच्याच गझला बेसूर होत, तेव्हा
“हे राम!” कुणी म्हणती, म्हणतात कुणी “अल्ला!!!!” 

नवरा तिचा बिचारा दचकून दाद देतो,
द्यावी कशी न सांगा? करते लगेच हल्ला! 

तंद्रीत हातवारे अन् हावभाव भलते,
["मेंटल असायलम"चा गाठेल काय पल्ला?] 

कवयित्री: क्रांति साडेकर