प्रिया?

अशी प्रिया पाहण्यात नाही,
पती जिच्या सापळ्यात नाही!

कभिन्न काळा वर्ण प्रियेचा
तशी मजा सावळ्यात नाही!


बनेल बोक्यापरी टपोरी,
जरा मृदू वागण्यात नाही!

नको नको तेच शोधणारी,
नजर अशी कावळ्यात नाही!

अखंड गाणे भसाडवाणे,
सुरेल काही गळ्यात नाही!

तिने करावे, अम्ही गिळावे,
रुची तिला रांधण्यात नाही!

तिच्याप्रमाणे हुशार कोणी,
कलागती लावण्यात नाही!

विनोद व्हावा, तिला कळावा,
अशी प्रथा आमच्यात नाही!

कवयित्री: क्रांति साडेकर