नच माते करू कोपा!

मूळ गीतः नच सुंदरी करू कोपा

विडंबन : नच माते करू कोपा

नच माते करू कोपा,
मजवरि धरी अनुकंपा. ॥धृ॥

पोरी तुज बहु असती, परि प्रीती मजवरती,
जाणसि तू हे चित्ती, मग का घालिसि भीती?
करी मी दंगा मस्ती, तरी वाटे तव धास्ती,
प्रेमा तो मजवरिचा, नेऊ नको लोपा …॥१॥

(आईने कान पकडून म्हटले, ‘मेल्या..’, मुलगा म्हणाला थांब, थांब.
अजून गाणे संपले नाही ….)

करपाशीं या तनूला, बांधुनि करी शिक्षेला,
धरुनीयां कानाला, गुच्चा घे गालाला
परि ना धरी अबोला, रडू येईल मग मजला.
शिक्षा ती अती कठोर, होईल मत्पापा,  ॥२॥

नच माते ….

(हे गीत एका तीन बहिणींच्या पाठीवर जन्मलेल्या, लाडोबा मुलाचे आहे.)

रचनाकार: प्रभाकर फडणीस

1 टिप्पणी:

Suhas Diwakar Zele म्हणाले...

विडंबन मस्त जमलंय... :)