पुरणाचे बनकेक

साहित्य: २ वाट्या चण्याची डाळ
२ वाट्या गूळ
सुकामेव्याचे तुकडे,वेलचीचूर्ण
२ वाट्या मैदा
१/२ वाटी रवा
मीठ, तेल किंवा तूप

कृती: नेहमीप्रमाणे डाळ मऊ शिजवावी. पाणी काढून गूळ व सुकामेव्याचे तुकडे,वेलचीचूर्ण इत्यादि घालून अजून शिजवावे.
पुरण वाटण्याची गरज नाही.
रवा,मैदा,चवीपुरते मीठ आणि जास्त मोहन घालून भिजवावा. १ ते २ तासानंतर पुर्‍या लाटून पुरी हातात धरून मध्ये पुरण घालून मोदकासारखा आकार द्यावा मात्र वरचे तोंड बंद करू नये. त्यानंतर ओव्हनमध्ये बेक करावे.

करंज्या व बनकेक होळीसाठीच नव्हे तर पाहुण्यांसाठी किंवा पार्टीसाठीही करण्यास सोपे आहेत.हे पदार्थ एक-दोन दिवस सहज टिकतात त्यामुळे गृहिणींना हे करायला नक्कीच आवडतील.

लेखिका: जयबाला परूळेकर



1 टिप्पणी:

Suhas Diwakar Zele म्हणाले...

ओहह्ह...नवीन रेसीपी, कधी तरी नक्की ट्राय करेन :)