माझे जेवण गाणे!

मूळ गीतः माझे जीवनगाणे

                                                              विडंबनः माझे जेवण गाणे

माझे जेवण गाणे, गा..णे.
व्यथा असो आनंद असू दे,
उपास किंवा उत्सव असूदे,
भूक असो अथवा न असूदे
खात पुढे मज जाणे, जाणे,
माझे जेवण गाणे.. ॥धृ॥

कधी जेवतो हॉटेलातून,
कधी ऑफिसच्या कॅंटीनातून,
कधी ढाब्यातून, कधी 'खोक्या'तून,
पोट भरुनि मज घेणे, घेणे,
माझे जेवण गाणे .... ॥१॥

या मित्रांनो माझ्या मागे,
चवीपरीने खाऊ संगे,
तुमच्यापरि माझ्याही खिशातून,
खुळखुळते हे नाणे, नाणे .....
माझे जेवण गाणे, गा...णे. ॥२॥

रचनाकार आणि गायक: प्रभाकर फडणीस

२ टिप्पण्या:

Suhas Diwakar Zele म्हणाले...

खात पुढे मज जाणे, जाणे :)

मस्त मस्त ...!!!

आनंद पत्रे म्हणाले...

ः)