न्यूज रूम -भाग २

कृष्णकांत – What rubbish, डोकं ठिकाणावर आहे का तुमचं…काय बोलताय तुम्ही? आपण पत्रकारिता करतो. असं काही केलं तर लोक शेण घालतील तोंडात…. मला नाही आवडली ही कल्पना.

तो – सर, विश्वास ठेवा. लोकांना हेच बघायला आवडतं आजकाल. एक प्रिन्स खड्ड्यात पडतो आणि ती चार दिवस ब्रेकिंग न्यूज़ होऊ शकते. वाराणसीमध्ये जेव्हा बॉम्बब्लास्ट होतो ती ब्रेकिंग न्यूज़, भारताने मॅच जिंकली ह्या ब्रेकिंग न्यूज़च्या मागे दडून जाऊ शकते. सर, आपण काही करू शकतो. आपण मीडिया आहोत. आपण खर्‍याचं खोट आणि खोट्याचं खरं करू शकतो. एका छोट्यात छोट्या बातमीला कसं मोठं करायचं ते आपल्या हातात असतं. आणि कितीही मोठी बातमी असेल ती आपण ब्रेक न करता त्या बातमी मधून हवा काढू शकतो. आपल्याला बातमी मोठी आणि छोटी दोन्ही करायला पैसे मिळतील सर. Trust me.

कृष्णकांत – हे सगळं नवीनच ऐकतोय. मला नाही वाटत हे ठीक आहे. पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा पाया आहे. आपल्याला असे वर्तन शोभा देणार नाही.

तो – सर, चिक्कार पैसा मिळेल आपल्याला. लोकांना बातम्या काय न्यूज़ पेपर्सपण देतात, मग त्यांच्यात आणि आपल्यात काही फरक असायला नको?

कृष्णकांत – (चिडून ओरडत) नाही हे मला, अजिबात आवडलं नाही. This is nonsense. I will not let this happen here.

सगळे शांत झाले. कोणालाच काही बोलायचा धीर होत नव्हता. तेवढ्यात स्पीकरमधून मोठ्या साहेबाचा आवाज आला. सगळ्यांनी बाहेर जा. मला कृष्णकांतशी बोलायचे आहे. सगळे बाहेर निघून गेले. कोणालाच कळले नाही आत काय होतंय.

दुसरा दिवस -

सकाळी ७ ला बातम्या.. ७:२० ला गणपतीची आरती….७:३० ला भविष्य कथन… ८ ला ठळक बातम्या…८:१० ला चुलबुली राखीची मुलाखत…८:३० ला काही गमतीदार यू ट्यूब वीडियोज….९ ला विशेष व्यक्तीची मुलाखत… ९:३० ला क्रिकेट… १० ला ब्रेकिंग न्यूज़.. अमिताभला ताप आला… ११ कसाबला मराठी कस यायला लागलं यावर विशेष एक तासाचा भाग….१२ ला ठळक बातम्या…१२:३० ला टीवी मालिकांचे भाग आणि चर्चा..१ ला कुकिंग शो…२ ला कोणाची तरी मुलाखत…३ ला घोटाळा…३:३० ला सिनेमाची गाणी.. मग थोड्यावेळाने सकाळपासूनच सगळं पुन:प्रक्षेपण.

आजच्या घडीला, अब-तक भारतातील नंबर एक न्यूज़ चॅनेल आहे. चॅनेलचे मालक आता निवांत आहेत ही प्रगती बघून. सगळे आता त्यांच्या कल्पना वापरून, आपलं स्पर्धेतील अस्तित्व टिकवू पाहत आहेत. लोकांना मनोरंजनाचं एक उपयुक्त साधन मिळालंय.

कृष्णकांतच्या मीटिंगमध्ये न्यूज़ चॅनेलच्या नवीन संकल्पना सांगणारा तो तरुण, आज अब-तकच्या ऑफिसमध्ये न्यूज़ रूममध्ये मीटिंग घेऊन लोकांना ऑर्डर देतोय आणि हो.. कृष्णकांत यांची तीच शेवटची मीटिंग होती त्या ऑफिसात…

लेखक: सुहास झेले



५ टिप्पण्या:

SUDHIR KANDALKAR सुधीर कांदळकर म्हणाले...

वा! आवडले. अगदी मर्मावर बोट ठेवलेत.

क्रांति म्हणाले...

सही!

आनंद पत्रे म्हणाले...

अतिशय मार्मिक!!!

देवदत्त म्हणाले...

पत्रकारितेतील सद्य परिस्थितीचा लेखाजोखा.

Suhas Diwakar Zele म्हणाले...

सर्वांचे मन:पूर्वक आभार :)