सोपी पुरणपोळी

होळीच्या निमित्ताने घरोघरी पुरणपोळी केली जाते;पण पुरणपोळीचा घाट-खटाटोप खूप असतो. म्हणून त्यासाठी हे तीन पदार्थ..पुरणाचेच पण सोपे.


१) सोपी पुरणपोळी

साहित्य: चणाडाळ किंवा तूरडाळ- २ वाट्या
गूळ २ वाट्या
मैदा २ वाट्या
गव्हाचे पीठ १/२ वाटी
वेलचीचूर्ण, जायफळचूर्ण आवडीप्रमाणे
तेल,मीठ

कृती: डाळ चांगली मऊ होईपर्यंत शिजवावी. जास्तीचे पाणी असल्यास त्यातले थोडे ठेऊन बाकीचे काढून टाकावे. ही डाळ मिक्सरमध्ये वाटून घ्यावी आणि नंतर त्यात गूळ घालून ती शिजवावी.
कणीक,मैदा चवीपुरते मीठ व जास्त तेल घालून सैलसर मळून घेऊन नंतर २ तास भिजत ठेवावे.
त्यानंतर पोळ्या कराव्यात.

लेखिका: जयबाला परूळेकर

1 टिप्पणी:

Suhas Diwakar Zele म्हणाले...

छान लागते, आई ने केली होती ही एकदा :)