मिश्किली लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मिश्किली लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

व्यवस्थापकीय कौशल्य



माणसाकडून चुका होणं



हे स्वाभाविकच आहे



पण त्याकरीता



तिसर्‍याच माणसाला जबाबदार धरलं जाणं



ह्याला व्यवस्थापकीय कौशल्य म्हणतात

पायजमा



जर तुम्ही



जमिनीवर पाय घट्ट रोवून उभे राहिलात



तर......



पायजमा कसा काय चढवणार ?

लक्ष्य


तुमच्या लक्ष्यावर नेम धरा



आधी मारा



आणि जिथे लागेल



त्यालाच तुमचं लक्ष्य म्हणा

आशा-निराशा

तुम्हाला पैसे हवे आहेत ?


उधार ?


एखाद्या निराशावादी माणसाकडून घ्या.


अशीही


त्याला ते परत मिळण्याची आशा नसतेच.

समस्या

तुमच्या समस्या हसण्यावारी न्या.


नाहीतरी इतरही लोक त्यावर हसतच असतात.

गंमत



काय गंमत आहे पहा....



तुम्ही जर म्हणालात की आकाशात ४ लाख तारे आहेत... तर



लोकं सहज विश्वास ठेवतात.



पण तेच तुम्ही जर म्हणालात की "रंग ओला आहे" तर



हात लावून खात्री करू पहातात.

कोणत्याही परिस्थितीत



कोणत्याही परिस्थितीत,



झोपेच्या गोळ्या आणि सारक



अशी दोन औषधे



एकत्र घेऊ नका

काळजी



जर तुम्हाला वाटत असेल की,



कोणालाच तुमच्या अस्तित्वाच्या असल्या नसल्याची



काळजी वाटत नाही



तर दोन-चार कर्जाचे हप्ते चुकवून पहा की राव !

एखादी कल्पना



एखादी कल्पना एखाद्याकडून चोरली तर



ती चोरी होते.



पण वेगवेगळ्या कल्पना वेगवेगळ्या लोकांकडून चोरल्यावर



जे होते ते संशोधन.

एक चोर



मी देवाकडे दुचाकी मागितली



पण मला ठाऊक आहे, देव मला ती देणार नाही



म्हणून मग मीच ती चोरली आणि



देवाकडे फक्त माफीची याचना केली.