वात्रटिका लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
वात्रटिका लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मेनू कार्ड !

तरुणी म्हणाली पार्कमधे,
आजोबा, टक लाऊन बघताय,
वय विसरून अजून,
तरुणपणात जगताय,
जागेवरून उठण्याची तरी,
आहे का रक्कत,
लाज शरमेपासून, वाटतेय
घेतली आहे फारकत!

आजोबा:-
खरंच, मदतीशिवाय पोरी,
शरीर जागचं सरकत नाही,
तरी,वार्धक्याचा विचार,
मनात कधी फिरकत नाही,
व्हिस्कीच पीत असतो अजून,
घेत कधी सरबत नाही,
डायटवर असणा-यांना,
मेनुकार्ड वाचायला हरकत नाही!

कवी: निशिकांत देशपांडे

भंगार !

दोघीजणी साठीतल्या
पार्लरमधे गेल्या
दोन तासांनी बाहेर
तरुण बनून आल्या

पहिली:

मी इतकी नटते सवरते
पण ’हे’ भारीच रुक्ष
’तो’ पहा, एकटक बघतोय
जसा तो शिकारी अन मी भक्ष्य

दुसरी:

पुरे, नकली सौंदर्याने
मिळणार नाही मोक्ष
तो आहे कबाडी, त्याचं
जुन्या भंगाराकडेच लक्ष

कवी: निशिकांत देशपांडे