मंडपाचे अनेक भाग होते. पहिल्याच भागावर मोठी पाटी मोठ्या दिमाखाने झळकली होती. “ Non-Alcoholic Anonymus “ हा काय प्रकार आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही आमचा कॅमेरा सरसावून आत शिरलो. एका छोट्या व्यासपीठावर एक अत्याधुनिक माईक आणि त्याच्या मागे महाराजांचे भव्य चित्र लावण्यात आले होते. नुकतेच कोणाचे तरी भाषण संपले होते. तेवढ्यात उद्घोषणा झाली. “आता आपल्या नीरस आयुष्याचे अनुभव कथन श्री. भालचंद्र विनायक तळीराम उर्फ गुलाब महाराज करतील.” मागच्या रांगेतून एक भगवा रेशमी झब्बा घातलेला, साधारणत: पन्नाशीचा माणूस उठला आणि त्या माईकच्या दिशेने जाऊ लागला.
अच्छा ! हेच का ते दारूबंदीचे कार्यकर्ते ! त्यांना बघताच तेथे एकच गोंधळ उडाला. साक्षात गुलाब महाराजांना तेथे बघून बर्याच लोकांना जागेवरच भोवळ आली आणि त्यांना तत्परतेने स्ट्रेचरवरून हालवण्यात आले. त्यातल्या एका स्वयंसेवकाला मी याबाबतीत विचारल्यावर त्याने अत्यंत अभिमानाने उत्तर दिले, “ महाराजांनी आम्हाला तयार राहायला सांगितलेच होते कारण या महासंमेलनात असे अनेक धक्के बसणार याची त्यांना कल्पना आहे.
आमच्या प्रथमोपचार केंद्राला आपण जरूर भेट द्या. देश विदेशातील प्रख्यात डॉक्टरांनी महाराजांच्या प्रेमापोटी येथे हजेरी लावली आहे.”
आमच्या उच्च रक्तदाबासाठी याचा काही फुकट उपयोग करू घेता येईल का हा विचार करत आम्ही श्री. गुलाब महाराजांच्या अनुभव कथनाकडे लक्ष देऊ लागलो.
आमच्या उच्च रक्तदाबासाठी याचा काही फुकट उपयोग करू घेता येईल का हा विचार करत आम्ही श्री. गुलाब महाराजांच्या अनुभव कथनाकडे लक्ष देऊ लागलो.
गुलाब महाराज त्या माईकसमोर कसेबसे उभे राहिले आणि त्यांच्या हातातला माईक खाली पडला. तो उचलण्यासाठी ते खाली वाकले ते उठलेच नाहीत. शेवटी त्यांना उभे करून धरून ठेवण्यात आले. ते काय बरळत होते ते सगळंच काही कळत नव्हते, पण जे काही शब्दबोधामृत आमच्यापर्यंत पोहोचले त्यातून आम्हाला खालील अर्थबोध झाला आणि आम्ही भारावून गेलो.
ते म्हणाले, "आत्तापर्यंत आम्हाला जे काही साक्षात्कार झाले त्यात सगळ्यात सुंदर आणि महत्त्वाचा साक्षात्कार आम्हाला महाराजांचे शिष्यत्व पत्करल्यावर झाला हे कबूल करायला आम्हाला अजिबात लाज वाटत नाही. गेली अनेक वर्षे आम्ही विविध प्रकारचे मद्य आमचे सगळे भक्त गेल्यावर गुपचुपपणे आमच्या खोलीत बसून पीत असू. पण महाराजांनी आम्हाला जी दीक्षा दिली त्यामुळे आमचे डोळे क्षणात उघडले व आता आम्ही आमच्या मित्रांच्या संगतीत आनंदाने विविध मद्याचा आस्वाद घेत फिरत असतो. एवढेच काय शंकर महाराजांचा आदर्श समोर ठेवून आता आम्ही आमची पाद्यपूजा करताना आमच्या भक्तांनी उंची शॅंपेनच वापरावी असा आदेशच काढला आहे. पूर्वी आम्हाला सतत कसली तरी काळजी वाटायची व आमच्या स्वप्नात सतत हडळी यायच्या. आता आमच्या स्वप्नात सुंदर अप्सरा येतात. हा चमत्कार महाराजांमुळेच……”
हे एवढे बोलणे होत आहे तेवढ्यात गुलाबू परत खाली कोसळले. ते आता अती आनंदाने बोलण्याच्या परिस्थितीत नाहीत हे ओळखून स्वयंसेवकांनी त्यांची तेथून त्वरित उचलबांगडी केली. ते दृश्य तर फारच मजेदार होते ! एखादी नौका समुद्रात हेलकावे खावी तसे ते चार स्वयंसेवक व त्यांच्या हातात असलेले महाराज हे एकदा या बाजूला तर एकदा त्या बाजूला असे हेलकावे खात चालत होते. मध्येच गुलाबूमहाराज किंचाळत होते तर स्वयंसेवक महाराजांचा गजर करत होते. त्यांनी तो दहा फुटी रस्त्याचा समुद्र धडपडत पार केला आणि सगळ्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.

आता पुढचा नंबर कोणाचा अशी उत्सुकता आमच्या मनात होतीच. तेवढ्यात एक मोठा घोळका माईकच्या दिशेने येताना दिसला. त्यांच्या खाकी अर्ध्या चड्ड्या आणि काळ्या टोप्या बघून आम्ही तर हादरलोच. हे येथे, हे संमेलन उधळायला वगैरे आले आहेत की काय असे वाटून आम्ही पळायच्या बेतात होतो तेवढ्यात त्या घोळक्याला स्वयंसेवकांनी अडवले व त्यांच्यापैकी एकालाच त्या सगळ्यांच्यातर्फे बोलायला सांगितले. थोडीशी हाणामारी होऊन त्यातल्या जरा वयस्कर वाटणार्या शाखाप्रमुखाने तो माईक हातात घेतला
“ मल्ल्याबाबा महाराज की जय ! चक दे इंड्या !" असे ओरडत त्याने आपले क्रांतीकारक विचार मांडले.
दक्ष ! आम्ही लहानपणापासून या पेयांच्या फायद्याविषयी ऐकत आलेलो आहोत. पण आमच्या घरच्यांच्या दबावाखाली आम्ही या थोर आनंदापासून वंचित राहिलो. आमचे तीर्थरूप स्वत:मात्र चोरून या पेयांचा आस्वाद घेत असताना आम्ही अनेकवेळा पाहिले आहे. आता मात्र आम्हाला राहवत नाही म्हणून आम्ही सगळी बंधने तोडून आमच्या आयांना चकवून येथे पळून आलो आहोत. आमचे प्रमुख आम्हाला यापासून आता रोखू शकत नाहीत. आम्ही प्रतिज्ञा करतो की या क्षणापासून आम्ही या बियर क्रांतीत भाग घेत आहोत.” असे त्वेषाने ओरडून त्याने हातातली बाटली संपवली व शुभशकून म्हणून तेथे एक नारळ फोडायला जसा दगड असतो तशाच दगडावर हातातली बाटली फोडली. त्या आवाजाबरोबर आख्या मंडपातून तसे आवाज घुमले आणि महाराजांचा जयजयकार झाला. हे ऐकल्यावर तेथे काही भगिनी होत्या त्या एकदम गाणी गायला लागल्या. त्याची चाल मै छोडके सारी लाज .....की घुंगरू टूट गये या गाण्याशी मिळती जुळती होती. नंतर कळले की ती महाराजांची प्रार्थना होती.

आता पुढे काय असा आमच्या मनात विचार येताच आम्ही ’पोपट हिरवा प्रिमियम’ नावाची बाटली तेथेच ठेवलेल्या एका बादलीतून उचलली व तोंडाला लावली व एका दमात रिकामी करून खाली फोडली. त्याबरोबर दोन चार स्वयंसेवक धावत आले. आता आम्हाला मार पडणार असे वाटून आम्ही खाली बसलो तर त्यांचा प्रमुख म्हणाला, “साहेब लाजू नका. या मंडपात १००० स्वयंसेवकांना फक्त काचा गोळा करायचेच काम दिलेले आहे. त्यातून जे स्वयंसेवक बियर पिऊन पडतील त्यांना उचलायचे काम अजून ५०० जणांना देण्यात आलेले आहे. आपण फक्त जरा बाजूला व्हा!”
जाताना त्यांनी न विसरता ’कावळा-पांढरा स्ट्रॉंग’ ची बाटली आमच्या हातात दिली. ते ऐकून व ती बाटली रिचवून आम्ही परत ताठ मानेने त्या मंडपात वावरू लागलो.